मोबाईल
झाला गुरू !
कुगावच्या
संतोषने मोबाईलद्वारे केला
पोलिस
उपनिरीक्षक परीक्षेचा अभ्यास
मोबाईलचा
शोध लागला आणि सर्वांना आनंदच
झाला. मग,
त्यात सुधारणा
झाल्या, स्मार्ट
फोन आला. त्यातही
अनेक सुविधा उपलब्ध झाल्या.
तथापि,
कॅमेरा,
व्हिडिओ शुटिंग,
फोटोशॉपचा
वापर करून फेसबुक,
वॉटसअॅपवरून
बदनामीचे प्रकार प्रामुख्याने
केले जाऊ लागले. मात्र
सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा
तालुक्यातील कुगावच्या संतोष
कामटे या तरूणाने मोबाईलचा
वापर करून आपल्या आयुष्याला
सुंदर वळण दिले. नुकत्याच
झालेल्या पोलिस उपनिरीक्षक
पदाचा अभ्यास संतोषने चक्क
मोबाईलवर केला. यासंदर्भात
बोलताना संतोष कामटे म्हणाला,
"कुठेही
ट्युशन किंवा स्पेशल क्लास
लावण्याइतके पैसे माझ्याकडं
नव्हते.
मात्र
मोबाईलवर टेलिग्राम नावाचे
चॅनल आहे.
त्यावरून
एमपीएसस्सीचा अभ्यास करता
आला. "
टेलिग्रामवरील
पीडीएफ फाईलच्या सुविधेमुळे
अभ्यासासाठी पुस्तके मोफत
उपलब्ध झाली.
रोज किमान
दहा तास अभ्यास केल्याचं
संतोषनं सांगितलं.
संतोषचे
वडील सालकरी गडी आहेत.
त्यामुळं
त्यांचं आर्थिक उत्पन्न बेताचं
आहे.
कुटुंबाचा
चरितार्थ कसाबसा भागवला जात
असताना संतोषच्या अभ्यासासाठी
पुस्तकांचा खर्च त्यांना
झेपणं शक्य नव्हतं.
मात्र संतोष
डगमगला नाही.
मित्रांच्या
मदतीनं त्यानं पोलिस उपनिरीक्षक
पदाचा अभ्यास केला.
केवळ पुस्तकी
अभ्यास करूनही भागणार नव्हतं.
म्हणून
संतोषनं शारीरिक क्षमताही
सुधारली.
त्यासाठीही
पुन्हा मित्रच कामाला आले.
आणि आता
पोलिस उपनिरीक्षक बनण्याचं
त्याचं स्वप्न साकार झालं
आहे.
"कठीण
समयी मोबाईल कामास येतो"
अशी नवी
म्हण संतोषच्या ध्यासानं
कॉईन झाली आहे.
तरूणांनी
मनात आणलं तर मोबाईल शत्रू न
वाटता आयुष्याला चांगलं वळण
देणारा उत्तम मित्र बनू शकतो,
हे सिद्ध
झालं आहे.
-
रजनीश जोशी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा