सामान्यांचा आवाज
ज्येष्ठ उर्दू शायर निदा फाजलींच्या शायरीतून जनसामान्यांची परवड प्रकटली हे खरं, ती दूर करण्यासाठीच त्यांनी आपलं शब्दसामर्थ्य वापरलं. सामाजिक एकतेचं स्वप्न साकारावं, यासाठी त्यांच्या लेखणीतून कधी निखारे पेटले; कधी फुलं बरसली.
""फलकपे लिखी जाती है कहानी सिर्फ उनकी, कलामसे कागजही नही, दीदावरोंकी रूह छू जाती है कलम जिनकी,''असं ज्यांच्या शायरीबद्दल म्हणता येईल, त्या उर्दू शायराचा स्वर निमाला. मुक्तदा हसन निदा फाजली असं त्यांचं नाव. "निदा'चा अर्थच मुळी आवाज ! सर्वसामान्य माणसाच्या आक्रंदनाला त्यांनी आपल्या शायरीतून आवाज दिला. "हरेक घरमें दिया भी जले, अनाजभी हो,' अशा आशयाचं पसायदानच त्यांच्या कवितेतून व्यक्त झालं आहे. कबीर, तुलसीदासांचा प्रभाव घेऊन सुरू झालेल्या त्यांच्या कवितेला यथाशीघ्र स्वतःची वाट सापडली. मात्र त्यांच्या कवितेचं, शायरीचं अंतःसूत्र मात्र माणसाचं दुःख, माणसाच्या वेदना आणि माणसाचं जगणं हेच राहिलं. माणूस सुखी झाला पाहिजे, हे त्यांच्या शायरीतलं अध्यात्म होतं."" घरसे मस्जिद है बडी दूर, चलो ये कर लें, किसी रोते हुए बच्चेको हॅंसाया जाए'', असं त्यांनी लिहिलं आणि त्या ओळींचा मथितार्थ न समजल्यानं गहजब झाला. पण निदा फाजली निर्भिड होते. त्यांनी सांगितलं, मशिदी बनवण्यात माणसांचे हात गुंतलेले असतात, मुलांना तर प्रत्यक्ष अल्ला घडवतो. त्यांच्या या सांगण्यानं कट्टरपंथीयांचा रोष कमी झाला. अनेक शहरांतल्या गल्लीबोळात राहणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य पळालं आहे, त्यांचं जगणं बोथटलं आहे. आपलं बाल्य हरवलेली ही मुलं भटकताना दिसतात, तेव्हा निदा फाजलींचं काळीज पिळवटून निघतं. सुख, समाधान, आनंद कुठं आहे, याचा शोध घेताना ते म्हणतात,"" रहेगी कबतक वादोंमे कैद खुशहाली, हरेक बार कल क्यूं? कभी तो आज भी हो''
दिल्लीत जन्मलेल्या निदाजींचं भारतावर निरतिशय प्रेम होतं. या देशातल्या माणसांवर प्रेम होतं. म्हणूनच त्यांचे कुटुंबीय कायमचे पाकिस्तानात गेले तरी त्यांनी आपला देश सोडला नाही. पण नंतरच्या काळात राज्यकर्त्यांच्या निर्णयामुळं ते व्यथितही झाले होते. सामान्य माणसाच्या शक्तीला दुर्बल समजण्याची चूक करू नका, सत्ता उलटवून टाकण्याची ताकद त्यांच्यात असते, असं त्यांनी बजावलं होतं. हिंदू-मुस्लिमांमधील अंधश्रद्धा, वर्णव्यवस्थेवरही त्यांनी प्रहार केले. राज्यकर्त्यांनी मंदिर-मशिद बांधण्याचे उद्योग कशाला आरंभले, अर्थात याशिवाय ते दुसरं करणार तरी काय, असं परखड मत त्यांनी एकेठिकाणी व्यक्त केलं होतं.
माणसामाणसांतील प्रेम हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. ज्याला प्रेम समजलं, त्याला जगणं कळालं. माणसाच्या जगण्याचा सारांश म्हणजेच प्रेम. आधी प्रेम करायला शिका, म्हणजे जगायला आपोआप शिकाल, असं त्यांनी लिहून ठेवलं आहे. "रजिया सुलतान'पासून त्यांची बॉलीवूडमधली मुशाफिरी सुरू झाली. पण आशयाशी तडजोड करणारी गीतरचना त्यांनी अजिबात केली नाही. "कभी किसीको मुक्कमल जहां नही मिलता, कहीं जमीं तो कही आसमां नही मिलता,'या ओळी ऐकताना कवीचं मनस्वीपण प्रत्ययाला येतं. प्रत्येकजण बोलू शकतो, पण संवाद मात्र हरवला आहे. अग्नीशीच दोन हात करायचे असतील, तर धुराचं कीर्तन कशासाठी? हा कुसुमाग्रजांना पडलेला प्रश्नही निदाजींनी विचारला होता.
माणसाला सदैव नाडणारी व्यवस्था, ती चालवणारे शासक, व्यवस्थेमुळं भरडून निघणारी माणसं आणि दिवसेंदिवस बिघडत चाललेलं वास्तव निदा फाजलींना अस्वस्थ करत होतं. शोषकांच्या प्रश्नाला सतत होकारार्थी उत्तर देऊन परिस्थिती आणखी बिघडवून कशासाठी घेता, कधी तरी "नाही' म्हणायला शिका, शोषणाविरूद्ध आवाज उठवा, असा संदेश त्यांनी जनसामान्यांना दिला. निदाजी एका अर्थानं शोषितांचा प्राणशब्द होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा