पाणी आणि पर्यावरणाचे अभ्यास केंद्र !
-----
शेती आणि ग्रामविकास हाच आयुष्यभराचा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या आंधळगावच्या डॉ. अप्पासाहेब पुजारी यांच्या संकल्पनेतून पाणी आणि पर्यावरण अभ्यास केंद्राची स्थापना होत आहे. मंगळवेढा तालुक्यातील गरीबी आणि ग्रामविकासाचा त्यांनी अभ्यास करून स्वतःचे काही मूलभूत सिद्धांत त्यांनी मांडले. त्याचप्रमाणे, डाळिंब आणि बोर फळबागांचा विकास कसा करता येईल, यावर त्यांनी प्रबंध लिहिला. सांगोला तालुक्यात डाळिंबाच्या फळबागा मोठ्या प्रमाणात लावल्या गेल्या, या विकास प्रक्रियेत डॉ. पुजारी यांनी लिहिलेल्या प्रबंधाचा मोठा वाटा होता. त्यातील काही तथ्यांचा विचार करून शेतकऱ्यांनी फळबागा विकसित केल्या. सांगोला, मंगळवेढ्यासारख्या दुष्काळी तालुक्यांमध्ये उत्तम जलव्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं. बाजाराचा अभ्यास केला तर डाळिंब आणि बोर उत्पादकांना तोटा होण्याचे कारण नाही. माण खोऱ्यातील शेतीसमस्यांवर त्यांनी अनेक उपाय सुचवले आहेत. कन्नड मातृभाषा असूनही मराठी भाषेवर प्रभूत्व असणारे डॉ. पुजारी नेहमी नवनवीन प्रयोगांमध्ये रमलेले असतात. त्यांनी कमी क्षेत्रावर जास्त उत्पादन देणाऱ्या तुरीची लागवड केली. हा प्रयोग आधी स्वतःच्या शेतात त्यांनी यशस्वी करून दाखवला. महाराष्ट्राच्या विविध भागात फिरून शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगांची प्रत्यक्ष पाहणी ते सतत करीत असतात. कर्नाटकातील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांशी ते संबंधित आहेत.
आपल्या अभ्यासाचा विषय अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी पाणी आणि पर्यावरणाच्या अभ्यासकांसाठी आंधळगावातील आपल्या फार्महाऊसमध्येच अभ्यास केंद्र काढले आहे. या विषयावरची अनेक पुस्तकं त्यांनी तिथं ठेवली आहेत. शेतकरी, विद्यार्थी आणि अभ्यासकांना त्याचा फायदा होऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे, पण तो चिरकाळ टिकणार आहे का? "एनटीपीसी'सारखा प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातील प्रदूषण वाढवणार आहे, त्याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. या प्रकल्पाला सर्वाधिक पाणी लागते, जे उजनी धरणातून उचलले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्याचे पर्यावरण या प्रकल्पाने धोक्यात आणले आहे, दुसरीकडं माळढोक अभयारण्याचं क्षेत्र कमी करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून माळढोकचा विचार एकेकाळी सुरू होता, पण दिवसेंदिवस त्याची संख्या घटते आहे. जमिनींची खरेदीविक्रीला मज्जाव आणि तत्सम अनेक गोष्टींमुळे शेतकऱ्यांना माळढोक आपला शत्रू वाटतो आहे. त्यामुळेही त्याची गुपचूप हत्या केली जात असावी. त्याबाबत जनजागरण करून सोलापूरचं पर्यावरण समृद्ध करण्याची गरज आहे.
उद्योगधंदे वाढत नसतानाही सोलापूर शहराचं प्रदूषण प्रचंड वाढत आहे. प्रदूषित पाणी लोकांना प्यावं लागत आहे. शुष्क नद्या भयावह ठरत आहेत. या सगळ्याचा अभ्यास करून त्यावर नेमके उपाय शोधण्यासाठी डॉ. पुजारी यांनी स्थापन केलेल्या पाणी आणि पर्यावरण केंद्राचा फायदा होणार आहे. फक्त सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या पाणी व पर्यावरणाचा तपशील इथं पुढच्या काळात उपलब्ध असेल. आर्थिक विकास आणि पर्यावरण यांची सांगड घालताना शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाचा एकत्रित विचार होणं गरजेचं आहे. प्रशासन, सरकारी यंत्रणा आणि उद्योजक अशा सगळ्यांना दिशादर्शक असं काम या अभ्यासकेंद्रातून होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा