शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

आई-बाबा मला वेळ द्या....

एके दिवशी मी आईला विचारलं"आईबाबांना पगार किती आहे?" तर आई माझ्या अंगावर ओरडलीच,म्हणाली, " काय करायच्यात तुला नसत्या चौकशा?"
मी मग गप्पच बसलेआई तिच्या तिच्या कामात मग्न झाली.
मी मग बाबांची वाट बघत बसलेरात्री उशिरा कधी तरी बाबा आलेपण मला झोप लागली होती.
आईला काही विचारायला जावंतर तिचे फोनतिच्या क्लबच्या मीटिंग्जशॉपिंगएक ना दोन.आमच्या घरी काम करणाऱ्या मावशीच माझं सगळं करतातमला खूपदा वाटतंआईनं माझे लाड करावेतबाबांच्या गळ्यात हात घालून त्यांना प्रश्न विचारावेतपण बाबा मी उठायच्या आत लवकर जातात आणि मला झोप लागल्यावर येतातपैसे मिळवण्यासाठी तेवढं काम करावंच लागतं म्हणे.
एकदा मी बाबा येईपर्यंत जागत बसलेबाबांना विचारलंच, " इतकं काम करता तुम्हीतुम्हाला पैसे किती मिळतातरोजचे?"
"हजारो मिळतात चूप,?" असं म्हणून त्यांनी मला गप्प केलं.
महिनाभर मी खाऊचे पैसे साठवलेपुन्हा एकदा जागून बाबांना भेटलेम्हणाले, "बाबामाझ्याकडं ५०० रूपये आहेततेवढे घ्या आणि तेवढ्यात तुमचा जेवढा वेळ मिळेल तेवढा मला द्या?"
बाबा थोडं रागावलेमग गप्पगप्प झालेत्यांनी आईला बोलावलंमी पाचशे रूपये देऊन त्यांचा वेळ मागतेयअसं म्हणालेथोडावेळ दोघेही शांत राहिलेमग आधी बाबांनी मला उचलून माझे पापे घेतले.मग आईनं....!
"असं का केलंस?", आईनं मला विचारलं.
"मग मी काय करूमाझ्याशी बोलायला तुमच्याकडं वेळच नव्हतासकाळी उठल्यावर आपल्या बागेतलं उमललेलं फूल मला तुम्हाला दाखवायचं असतंपण आईतू माझ्यामागं शाळेला उशीर होईल म्हणून ओरडत असतेसमला डब्यात भाजी पोळी हवी असतेतसं तुला सांगावं तर डबा मावशीच करतातरोज रोज सँडवीच खाऊन कंटाळा येतो ना मला....! मला मांजर खूप आवडतेअसं नुसतं म्हणाले तर किती वस्सकन् ओरडलीस आई तू माझ्यावरबाबाआई असं रागावते म्हणून तुम्हाला सांगायचं होतंपण कितीतरी दिवस आपली भेटच नाही झालीतुम्ही पैसे मिळवण्यासाठी दिवस-रात्र काम करताम्हणून माझ्या वाटेचा वेळ मी पैसे देऊन विकत घेतला तुमच्याकडूनमला टीव्हीवरचे तेच तेच कार्यक्रम बघायला आवडत नाहीतमला बाबांच्या पाठीवर बसून घोडा घोडा खेळायचं असतंशेजारचा गणू त्यांच्या बाबांच्या खांद्यावर बसून गणपतीचा देखावा बघायला गेला होतामला तसं तुमच्या खांद्यावर बसायचं होतंबाबा,तुम्ही खांद्यावर घेतल्याशिवाय मला दूरचं जग दिसणार कसंसांगा नाघटकचाचणी परीक्षेत मला गणितात पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेवर्गात सगळ्यांनी माझं कौतूक केलंआईतुला हे सांगायला आले तर , 'सरक ग तिकडंवेळ नाही मला', असं म्हणून ढकलून दिलंसमी त्यादिवशी जेवले नाहीतर तू मावशींना नाही तसलं बोललीसमाझ्या न जेवण्याचं कारण तू होतीसपण मावशींवर तू ओरडलीस.माझ्या पाठीवर हात ठेवून फक्त एकदा जरी मला 'जेव गं राणीम्हणाली असतीस तर मी उड्या मारत जेवले असतेमला बागेत फिरावं वाटतंआपल्या फुलझाडांना पाणी द्यावं वाटतंपण अंगाला माती लागेल म्हणून आई तू मला तिकडं फिरकू देत नाहीसव्हिडीओ गेम किंवा मोबाईल टॅबपेक्षा मला छान छान गोष्टींची पुस्तकं वाचायला आवडतातपण सारखी सारखी नवी पुस्तकं कुठून आणायची म्हणून तू मला शंभर गेमची सीडी आणलीसमला स्वयंपाक करायला आवडतंकाडेपेटीवरील छापांचा संग्रह करायला आवडतंपण बाबा, 'ही कसली भिकारडी थेरंम्हणून तुम्ही माझे सगळे छाप फेकून दिलेमला काय आवडतंहे एकदा तरी विचारलंत का मलामी चुकले तर जरूर शिक्षा करापण माझं चुकतंय हे पाहण्यापुरता तरी मला वेळ द्याबाबामाझ्या वाढदिवसाला महागडी खेळणी पाठवता तुम्हीमला खेळणी नकोपिझ्झा नकोसिेनेमा नकोफक्त तुमचं बोट हातात धरून फिरायला जायचं होतं मला.माझ्या मैत्रिणींना मला दाखवायचं होतं, 'बघामाझ्या बाबांना माझ्यासाठी वेळ आहेआम्ही फिरायला बाहेर पडलोय...' आई-बाबामला तुमच्याकडून दुसरं काही नकोआपण एकत्र जेवायला बसूयाआई,शॉपिंगला जाताना मला कधीतरी मलाही नेम्हणजे वस्तूंचे भाव कसे करायचे असतात ते मला कळेल.एकदा रात्री उशिरा दोघं जोरजोरात भांडत होतातमाझी झोपमोड झालीइतके पैसे मिळवूनही तुमचं भांडण पैशावरूनच होतंअसं झोपेत मी ऐकलंएकदा रात्री मला भयानक स्वप्न पडलंमी किंचाळले.त्यावेळी आईतुझ्या कुशीत शिरून गुडुप झोपायचं होतं मलाजाऊ देआता तुम्ही दोघांनी मला वेळ दिलायमाझं ऐकून घेतायआणि मी वेड्यासारखीतुमच्या तक्रारी काय सांगतीयआई-बाबाआता जसा मला वेळ दिलात नातसाच वेळ कायम द्याद्याल ना?"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा