शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

सोलापूरचं सांस्कृतिक वैभव !

साल बहुधा १९८४ असावंवेळ रात्री आठची आणि दिवस अर्थातच नोव्हेंबरातलेथंडीचेराज्य नाट्य स्पर्धा सुरू होत्या.श्रीराम पंडितप्राप्रकाश कुलकर्णीइसाक शेखस्नेहल परांजपे,शिरीष घाटे असे आम्ही सगळे 'हुतात्मा'समोरील मोकळ्या जागेत 'महापूर'बद्दल बोलत उभे होतोराम पंडित मुख्य भूमिकेत होतामाझी भूमिका अगदी छोटी होतीपण नाटकाचं नेपथ्य,रंगमंच व्यवस्थाप्रकाश योजनानाटकातील लहानमोठी प्रॉपर्टी जमवणे या कामात माझी मोठी मदत प्राप्रकाश कुलकर्णींना होत असावीभैय्या उपारे पार्श्वसंगीत देणार होतातोही हरिभाई देवकरण प्रशालेत चालणाऱ्या आमच्या सरावादरम्यान रोज उपस्थित राहत असे. 'हुतात्मा'मध्ये आमची चर्चा सुरू होतीती नाटकातल्या कोर्टसीनमध्ये वापरायच्या लाकडी पिंजऱ्याची.आरोपी आणि साक्षीदार ज्या लाकडी पिंजऱ्यात उभं राहून साक्ष देताततो पिंजरा कसा तयार करायचायाविषयी बोलणं सुरू होतंइतक्यातइनशर्ट केलेले एक गृहस्थ पार्किंगमधून सभागृहाच्या दिशेनं येत होतेत्यांना पाहून प्राकुलकर्णींनी हात केला आणि ते आमच्यापाशी आलेबाकी सगळ्यांना ते नावानिशी ओळखत होतेप्राकुलकर्णींनी माझी ओळख करून दिलीमी पोरगेलापण अतिशय प्रेमानं त्यांनी माझा हात हातात घेऊन सलगी दाखवलीनाटकाची तालीम कशी सुरू आहे, 'महापूरअवघड नाटक आहे वगैरे बोलणं झालंकुणीतरी नाटकातल्या लाकडी पिंजऱ्याबद्दल मुद्दा मांडलालगेच त्यांनी तो कसा तयार करायचात्यासाठी लाकूड कुठं मिळेलकिती लागेलत्या पिंजऱ्याची उंची किती असेल, 'एलटाईप केला तर लाकूड कमी लागेल वगैरे सांगायला सुरूवात केलीनामदेव वठारे यांची माझी ती पहिली भेटसगळे हौशी नाटकवाले खिशातून पैसे घालून रंगमंचावर उभे राहणारेत्यामुळे पिंजऱ्याला किती खर्च येईल त्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलानामदेव वठारे म्हणाले,बॅटन पट्ट्या वापरा की मग.' शिरीष घाटेंच्या लक्षात आलं तेत्यांनी त्यांच्या शैलीत गालातल्या गालात हसत होकार दिला आणि 'महापूर'मधल्या कोर्टसीनच्या नेपथ्याचा प्रश्न मिटलासहज जाता जाता नामदेव वठारे यांनी मोठी अडचण दूर केली होतीबोलणं झालं आणि ते थिएटरमध्ये निघून गेले.प्रकाश कुलकर्णीराम पंडित यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वास्तविकत्या काळात आपापल्या नाट्य संस्थांबद्दल प्रत्येकाला प्रचंड अभिमान असेस्पर्धेचं वातावरण होतंच.शिवाय एका नाट्यसंस्थेतील कलावंतानं दुसऱ्या नाट्यसंस्थेच्या नाटकात काम करायचं नाहीअसा अलिखित दंडकच होता.कलावंतही संस्थेशी निष्ठा ठेवतआपल्याला भूमिका नसली तरी दररोज तालमीला हजर राहतकाही हवेनको ते पाहतगरजेला खंबीरपणे उभं राहतत्यामुळं नामदेव वठारे यांनी अशा पद्धतीनं बहुमोल सूचना करणं सगळ्यांनाच आनंददायी वाटलं. 'महापूर'शी संबंधित आणखी एक घटनामंदार काळे ललित कला मंदिराशी निगडितपण ह.दे.प्रशालेतल्या 'महापूर'च्या तालमीला नित्य येईनाटकात वकिलाची एक भूमिका होतीती मंदारनं करावीअसं मी एकेदिवशी त्याला सुचवलंतेव्हा तो म्हणाला, 'मी दुसऱ्या नाट्यसंस्थेत काम करतोमला विचारावं लागेल.' दिग्दर्शक प्राप्रकाश कुलकर्णींनी मंदारला भूमिकेबद्दल विचारलंतेव्हा नामदेव वठारेंची परवानगी घेऊनच तो'महापूर'च्या कलावंत चमूत सामील झालानामदेव वठारेंबद्दल जो आदर सगळ्याच नाट्य संस्थांमध्ये होतात्याच्याशी संबंधित हे उदाहरण आजच्या काळात बोलकं ठरावं.
पुढं 'तरूण भारत'मध्ये मी 'सांस्कृतिक सोलापूरहा स्तंभ लिहायला लागलोसोलापुरातल्या सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती,संस्थांची माहिती मी त्यातून देत असे. 'ललित कला मंदिर'ची माहिती मला नामदेव वठारे यांनी सांगितलीत्यावेळी शैलजा मराठे यांनी मला ललित कला मंदिर आणि नामदेव वठारे या एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा आहेतते आदरानं सांगितलं.तो लेख तयार झालात्यात वापरायच्या छायाचित्राबद्दल विचार सुरू झालातेव्हा गुरू वठारे पुढं आलागुरूची एक स्टाईल पहिल्यापासून आहेत्याच्या डोक्यात जे असेल तेच तो प्रत्यक्षात उतरवतोमाझ्या त्या स्तंभात वापरलेले आधीचे फोटो त्यानं पाहिले होतेत्यामुळं ललित कला मंदिरच्या लेखात वापरायचा फोटो गुरूनं लेख प्रसिद्धीच्या एक दिवस आधी अल्बममधून काढून आणून दिला. 'हाच फोटो वापरा,' असंही सांगितलंललित कला मंदिरबद्दल असलेलं प्रेमसंस्थेबद्दल प्रसिद्ध होणारी माहितीयाविषयी नामदेव वठारे आणि गुरू यांना अतिशय आस्था होतीत्यासाठी त्यांची अखंड धडपड चाले.
कमी खर्चात उत्कृष्ट नेपथ्याबद्दल सहजपणे मार्गदर्शन करणारे नामदेव वठारेंची ती भेट आणि पुढं माझ्या 'रूपकनाटकाच्या नेपथ्याबद्दलच्या चर्चेतील गुरू वठारेगुरूनं वडिलांची आठवण म्हणून 'रंगकर्मी प्रतिष्ठाननावाची संस्था काढलीती तो एकहाती चालवतोराज्य नाट्य स्पर्धेत शोभा बोल्लीप्रदीप कुलकर्णी यांनी 'रूपकया माझ्या नाटकाचा प्रयोग केला.त्यातील नेपथ्यासाठी लागणाऱ्या वस्तू थेट विकत आणण्याचा निर्णय गुरूनं घेतलाघटना तीचपण काळ बदललेला आणि पिढीहीमात्र त्यांच्यात समानता एकचनाटक उत्तम झालं पाहिजेतडजोड करायची नाही.
नव्वदीच्या दशकातली घटनासारस्वत ब्राह्मण कार्यालय नुकतंच बांधलेलंडॉजब्बार पटेल एका कार्यक्रमाच्यानिमित्तानं तिथं आलेलेकार्यक्रम सुरू व्हायला वेळ होताशशिकांत लावणीससुशीला व्हनसाळेसंजीवनी काळे आणि डॉक्टर असे आम्ही बोलत होतोविषय निघाला नाटकांच्या निवडीचा राज्य नाट्य स्पर्धेत आता कोणते नाट्यप्रयोग होतातनाटकाची निवड कशी केली जाते वगैरे बोलणं सुरू होतंडॉजब्बार पटेल यांनी सोलापुरातल्या त्यांच्या आठवणी जागवल्यापुढं ते मुंबईत गेल्यानंतर नामदेव वठारे राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकाच्या संहितेसाठी घरी कसे येतयाविषयी डॉक्टर बोलत होते.जब्बारांनी काही नाटकांचा उल्लेख केलाम्हणाले'' नामदेवला अशी भरपूर पात्रांची नाटके लागतमी त्याला वेगळी नाटके सुचवेतर त्यात ललित कला मंदिरातील सगळ्या कलावंतांना भूमिका मिळणार नाहीतअसं नामदेव म्हणेबरंतशा पद्धतीचं एखादं नाटक आहेम्हणून मी सांगितलं की दुसऱ्या दिवशी नामदेव मुंबईत हजररेल्वेत टीसी असल्यानं त्याचा प्रवास अखंड सुरूच असेआपल्या नाट्यसंस्थेतील सगळ्या कलावंतांना भूमिका मिळणारं नाटक स्पर्धेसाठी करायचंहा नामदेवचा नाटकनिवडीचा 'क्रायटेरियाहोता.''
डॉजब्बार पटेल हे सांगत होतेतेव्हा नामदेव वठारे यांच्याबद्दलचा अभिमान ओसंडून वाहत होता. ''राज्य नाट्य स्पर्धा जवळ आली की नामदेवच्या मुंबईच्या वाऱ्या वाढतमला त्याचे सतत फोन येतमी कामात व्यग्र असेपण नामदेवच्या डोक्यात संस्थेचं नाटक एवढाच विषयत्याला नाटक मिळालं की मग मला उसंत मिळे,'' असं डॉक्टर म्हणालेनामदेव वठारे यांची तळमळच त्यानिमित्तानं जब्बारांनी अधोरेखित केली होती.नाट्यसंहिता चांगली मिळाली पाहिजेत्यात सगळ्यांना छोट्यामोठ्या भूमिका असल्या पाहिजेतमहिला कलावंतांचा आदर राखला गेला पाहिजे असे अलिखित नियमच होतेजे नामदेव वठारे पाळतपुढं अशीच घटना घडली ती पुन्हा माझ्याच 'छेदनाटकासंदर्भातराज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सोलापूर केंद्रावर ते नाटक पहिले आलेअंतिम स्पर्धेसाठी मुंबईतल्या यशवंत नाट्यगृहात त्याचा प्रयोग होणार होता.नाटकातलं नेपथ्यइतर छोट्यामोठ्या वस्तू कशा रेल्वेतून कशा न्यायच्यायावर चर्चा सुरू होतीगुरू म्हणाला, 'मी पाहतो काय करायचं तेगोपीउद्या आपण मुंबईला जाऊ.' लगेच दोघे मुंबईला गेलेनाटकासाठी नेपथ्य पुरवण्याचे काम करणाऱ्या मुंबईतल्या संस्थेकडून आवश्यक त्या वस्तू भाड्याने घेण्याचा निर्णय घेऊनत्यासाठी आगावू रक्कम भरून गुरू सोलापुरात परतला.नाटकासाठी खिशाला खार लावून घेण्याची नामदेव वठारे यांची निस्वार्थी वृत्तीच गुरूमध्ये संक्रमित झाल्याचं ते उदाहरण.
ललित कला मंदिरचा सुवर्णमहोत्सव हुतात्मा स्मृती मंदिरात मोठ्या झोकात झालात्यावेळी गुरूनेही खूप मेहनत घेतली होतीपण सुवर्णमहोत्सवी वर्षात संस्थेच्या सगळ्या जुन्या कलावंतांचा सत्कार आणि सन्मान झाला पाहिजेअशी संकल्पना नामदेव वठारे यांनी मांडलीतसा तो झालातेव्हा अण्णा शिवशरण आणि अन्य सारीच मान्यवर कलावंत मंडळी रंगमंचावर उपस्थित होतीललित कला मंदिर आणि नामदेव वठारे यांच्याबद्दल त्या समारंभात सगळ्यांनीच गौरवोद्गार काढलेएखाद्या मोठ्या एकत्र कुटुंबातली परगावीपरदेशी गेलेली मंडळी एकत्र जमावीत तसं ते दृश्य होतंडॉजब्बार पटेलही त्यावेळी उपस्थित होतेरंगमंचावर झालेल्या औपचारिक कार्यक्रमातही संस्थेबद्दलचा जिव्हाळा दिसत होता आणि कार्यक्रमाआधी व नंतर नामदेव वठारे यांच्याबद्दलचा सगळ्यांचा स्नेह पाझरत होतानाटक हे निमित्तपण विविध क्षेत्रात काम करणारीमोठमोठ्या हुद्द्यावर अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारी कलावंत मंडळी आपल्या परिवाराच्याच स्नेहसंमेलनात दाखल झाली होतीनामदेव वठारेंच्या प्रेरणेनं गुरूनं त्यासाठी परिश्रम घेतले होतेरेवण उपारेकाका आणि अन्य सगळ्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन होतंचअशोक बोंदार्डे यांच्यासारख्या अधिकारीपदावरील कलाकाराचं सहाय्यही होतं.पिता-पुत्राच्या संस्थेवरील प्रेमाची ती अनोखी साक्ष होती.
पुण्या-मुंबईतल्या नाटकांमध्ये नेपथ्याची किंवा प्रकाश योजनेची नवी कल्पना राबवली की आपणही ती करून पहावीअसं नामदेव वठारे यांना वाटत असेनटवर्य प्रभाकर पणशीकरांनी'तो मी नव्हेच'च्या निमित्तानं फिरत्या रंगमंचाची कल्पना राबवलीलगेच नामदेव वठारे यांच्याही मनात ललित कला मंदिरच्या नाटकासाठी फिरत्या रंगमंचाची कल्पना रुंजी घालू लागलीसोलापूरच्या हौशी रंगभूमीच्या इतिहासात फिरता रंगमंच आणणारे नामदेव वठारे हे पहिले नेपथ्यकार होतेअसं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीगुरू वठारेदेखील त्याच तयारीचा.ललित कलामंदिरचं नाटक असो किंवा अलीकडं रंगकर्मी प्रतिष्ठानचंनेपथ्यात नाविन्य असलं पाहिजेयासाठी गुरूचा अखंड विचार सुरू असतोपोरे ब्रदर्सच्या स्टुडिओत वेळोवेळी होणाऱ्या गप्पांच्या मैफलीत नवं काही तरी करण्याचे मनसुबे रचले जातातप्रादीपक देशपांडेरविकिरणनिशांत आणि अप्पू पोरेशरदकुमार एकबोटेनागेश सुरवसेअमोल धाबळे,अधूनमधून महेश चिंचोळीनागेश ताकमोगे यांच्याशी चर्चाविमर्शातूनहास्यविनोद करीत नवनवीन कल्पनांवर विचार केला जातोपोरेकट्ट्यावरील या हास्यविनोद आणि चर्चेचं महत्त्व गुरूनं वेळोवेळी मान्य केलं आहे.
नामदेव वठारे नाटकातील महिला कलावंतांची कुटुंबातील सदस्यांप्रमाणं काळजी घेतरात्री उशिरा नाटकाची रिहर्सल संपल्यावर त्यांना व्यवस्थित घरी पोचवणंत्यांना प्रवासात किंवा तालमीवेळी कोणतीही अडचण येऊ नयेयासाठी ते जागरूक राहतगुरू वठारे यांना ते बाळकडूच मिळालं आहे.गुरूच्याही मनात महिला कलावंतांबद्दल आदराची भावना आहे.फक्त आपल्याच संस्थेतील महिला कलावंतांबद्दल नाहीतर सोलापूरच्या रंगभूमीवर काम करणाऱ्या सगळ्या स्त्री कलाकारांबद्दल गुरूला नितांत आदर आहेतो अनुभव सगळ्यांनी वेळोवेळी घेतला आहे.
ललित कला मंदिरची नाटके आणि त्यांचं सादरीकरण याविषयी सोलापूरच्या कलावंत मंडळीत बऱ्याचदा उलटसुलट चर्चा होत असेकित्येकदा अनेक कलावंतांचं पाठांतरही नसेरंगमंचावर ही मंडळी विसरतमग प्रॉम्टिंगचा आवाज येईमी एकदा त्याविषयी नामदेव वठारे यांनाच विचारलं होतंम्हटलं,'असं कसं होऊ शकतं?त्यावर त्यांनी छान उत्तर दिलंते म्हणाले होते, 'आपण हौस म्हणून नाटक करतोनाटकात पाठांतर चोख असलं पाहिजे याबद्दल दुमत नाहीपण आमचे बरेच कलावंत शिफ्ट ड्युटी करणारे आहेततालमीसाठी रोजच्या रोज वेळ देणं त्यांना जमत नाहीपण त्यांची नाटकावरची निष्ठा अभेद्य आहेरेल्वेत शिफ्टमध्ये काम करणारी आमची कलावंत मंडळी दोन दिवसांनंतर सोलापुरात येतातस्टेशनवरून घरी जाण्याआधी ते नाटकाची तालीम करतात आणि मग घरी जातातनाटक चांगलं व्हावंयासाठी ते मेहनत घेत नाहीतअसं कसं मग म्हणता येईल?त्याचं हे प्रतिपादन ऐकून मी थक्कच झालो४८ तासांच्या ड्युटीवरून परतल्यावर घरी न जाता नाटकाची रिहर्सल करणारी ही नाट्यवेडी मंडळी सोलापूरचं भूषणच आहेत.ही तळमळही जिद्द आता अभावानंच आढळतेझटपट रिझल्टच्या मागे तरूणांमधले बरेचजण लागल्याचे आढळते.नामदेव वठारेंच्या लेखी नाटक महत्त्वाचं होतंचपण कलावंत असलेली माणसं त्यांना अधिक जवळची वाटत होती.नाटकातील भूमिका डावीउजवी झाली तरी चालेलपण माणूस म्हणून एखाद्या कलावंताच्या आयुष्यात काही कमीजास्त झालं तर स्वतः त्यांच्या मदतीसाठी ते उभं राहतअशी अनेक उदाहरणं आहेतनाटकाची तालीम संपली की कलावंतांशी संबंध संपलाअशी त्यांची वृत्ती नव्हतीएकदा ललित कलामंदिरात कलावंत आला की तो थेट नामदेव वठारे यांच्या आयुष्यातच,कुटुंबातच दाखल होईत्याच्या सुखदुःखात ते सामील होत.गुरूनंही हाच वारसा जपला आहेगुरूच्या सहवासात आलेले कलावंत गुरूचे मित्र होऊन जातातमग नाटक गौण होतंआणि मैत्री महत्त्वाची होतेसोलापूरच्या नाट्यसृष्टीत प्रत्येकाला लागेल ती मदत करण्याची गुरूची वृत्ती हे नामदेव वठारे यांच्या विस्तारलेल्या वारशाचं प्रतीक म्हणावं लागेलज्या भक्तीभावानं गुरूनामदेव वठारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवत असतोतेही नव्या पिढीसाठी आदर्शवत आहे.वडिलांचा कीर्तीसुगंध असा पसरवत असताना गुरू व्यक्तिगत लाभाऐवजी रसिक सोलापूरकरांना चांगली नाटके पहायला मिळावीत म्हणून प्रयत्नशील असतोनामदेव वठारे यांच्या मुशीत तयार झालेला गुरू वठारे हीच आता एक चालतीबोलती संस्था झाली आहेनामदेव वठारेंना यापेक्षा वेगळं काय हवं असणार? अशी कलावंतमंडळी सोलापूरच्या नाट्यसृष्टीत आहेत,हेही सोलापूरचं सांस्कृतिक वैभवच म्हणावं लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा