हिरवाईनं
नटलेली लोणारवाडी !
तीच
ती पर्यटनस्थळं,
तिथली
गर्दी,
पर्यटकांची
होणारी लूटमार असा अनुभव हौशी
पर्यटकांना नेहमीच येतो.
पण
स्वतःची बुध्दी आणि मेहनत
वापरून कल्पकतेनं नवं काही
घडवणारी तरूण मंडळी,
त्यांचे
प्रकल्प ही नवी पर्यटनस्थळं
प्रेरणादायी ठरू शकतात.
असे
प्रयोग आणि त्यांची यशस्विता
अनुभवण्यासाठी,
या
प्रयोगवीरांच्या पाठीवर
कौतुकाची थाप मारण्यासाठी
त्यांनी निर्माण केलेल्या
अभिनव,
चिरस्थायी
प्रयोगाला भेट देणं उचितच
ठरेल.
नाशिक
जिल्ह्यातील सिन्नरजवळील
लोणारवाडीत असाच एक प्रयोग
'युवामित्र'
या
तरूणांच्या संघटनातून आकाराला
आला,
त्यातून
मोठा कायापालट झाला.
तो
पाहण्यासाठी,
अनुभवण्यासाठी
एकवेळ तिथं अवश्य भेट द्यायला
हवी.
लोणारवाडी
आणि परिसरातील गावांमध्ये
फुललेल्या हिरव्या स्वप्नाची
ही माहिती...!
गावाकडच्या
शेतीत वर्षानुवर्षे कोरडवाहू
पिकं घेऊन कंटाळलेला एक
सुशिक्षित युवक भरपूर पैसे
कमावण्याच्या इच्छेनं नाशिकच्या
औद्योगिक वसाहतीत गेला.
तिथं
मिळेल त्या कारखान्यात काम
सुरू केलं,
महिन्याच्या
महिन्याला पैसे तर मिळू लागले,
पण
समाधान काही नव्हतं.
अधूनमधून
गावाकडं येणं होत असे.
गावाकडं
आलं की शेताकडं चक्कर होई.
त्याच्यासारखी
गावातली आणखीही काही तरूण
मंडळी अशीच शहराच्या वाटेवर
गेलेली.
एकदा
योगायोगानं ही सारी मंडळी
गावाकडं एकत्र जमली.
त्यांची
शेतीही एकमेकांलगतच.
एकेदिवशी
एकाला त्याच्या शेतातून पाट
निघाला असल्याचं दिसलं.
कोरडवाहू
शेतीत कसला आलाय पाट,
म्हणून
त्यानं दुर्लक्ष केलं.
पण
मित्र जमल्यावर त्यानं सगळ्यांना
हे सांगितलं.
दुसऱ्या
दिवशी आणखी दोघे आले,
म्हणाले,
'आमच्याही
शेतातून पाट निघाले आहेत.'
नाशिक
जिल्ह्यातल्या सिन्नरजवळ
असलेल्या लोणारवाडीतली ही
घटना.
लोणारवाडीत
सुनील पोटे नावाचा तरूणही
नाशिक,
मुंबईतल्या
कंपन्यांमध्ये काम करून
गावाकडं परतला होता.
एमएसडब्लू
करूनही मनासारखं काम मिळत
नसल्याची खंत होती.
सुनीलचीही
शेती होती.
गावातल्या
जवळपास प्रत्येकाच्या शेतातून
पाट निघाल्याची माहिती सुनीलला
मिळाली.
सुनीलनं
सगळ्या गावकऱ्यांना एकत्र
केलं,
तरूणांना
बोलावलं.
एका
रविवारी सगळ्यांनी या पाटाचं
मूळ शोधायचं ठरवलं.
आपापल्या
शेतातल्या पाटाचा माग काढत
यायचं ठरलं.
पाटाचं
तोंड एका कोरड्या जागी,
झाडोऱ्यापाशी
येऊन पोचत होतं.
सुनीलनं
मग तो झाडोरा श्रमदानानं दूर
करायचं ठरवलं.
अर्थातच
त्यासाठी गावाला मदतीला घेतलं.
आणि
काय आश्चर्य...
या
सगळ्यांच्या शेतात जाणाऱ्या
पाटाचं मुख एका कोरड्या नदीशी
जोडलेलं आढळलं.
तो
झाडोरा नदीच्या पात्रात
वाढलेला होता.
सुनील
आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी
आणखी शोध घेतला तेव्हा जवळच्या
डोंगरातच उगम पावणारी ही देव
नदी होती.
ब्रिटिशांनी
त्या नदीतून थेट पाट काढून
ते पाणी शेतकऱ्यांना पुरवलं
होतं.
स्वातंत्र्योत्तर
काळात,
कालांतरानं
नदी कोरडी पडत गेली.
तिच्यात
झाडं-झाडोरा
आणि कचरा वाढला.
शेतातल्या
पाटाची स्थितीही वाईट झाली.
त्यामुळं
कोरडवाहू शेती करण्यावाचून
गत्यंतर उरलं नव्हतं.
सुनीलच्या
युवामित्रांनी गाळ-गचपान
काढून टाकलं.
लोणारवाडीसह
आशापूर,
औंढेवाडी,
भाटेवाडी,
वडगावसह
पंचवीस गावांना वळसा घालून
जाणारी नदी प्रवाहित केली.
त्या
त्या गावातील ग्रामस्थांना
एकत्र करून त्यांच्याकडून
श्रमदान करवून घेतलं.
आपल्या
शेताजवळून नदी वाहते आहे आणि
आपल्याला त्याची माहिती नव्हती
हे त्यांना कळलं.
कोणत्याही
सरकारी मदतीशिवाय स्वतःच्या
बळावर सुनील पोटे आणि त्यांच्या
युवामित्रांनी एक मोठं काम
केलं होतं.
कोरडवाहू
शेतीसाठी सिंचन उपलब्ध केलं.
त्यातूनच
'युवामित्र'
संघटना
आकाराला आली.
ही
साधारण वीस वर्षांपूर्वीची
गोष्ट.
पावसाळा
आला आणि नदी पाण्यानं भरून
गेली.
प्रवाह
खळाळू लागला.
त्यानं
आसपासच्या विहिरी तुडुंब
भरल्या.
बोअरचं
पाणी वाढलं.
एक
हिरवं स्वप्न साकार होण्याच्या
दिशेनं वाटचाल सुरू झाली...!
पाच
ते पंचवीस एकरापर्यंत जमीन
असलेली तरूण मंडळी शेती परवडत
नाही म्हणून जगण्यासाठी
गावाबाहेर पडली होती,
ती
परत यायला लागली.
त्यातून
सुनील पोटे आणि त्यांच्या
युवामित्रचं काम वाढू लागलं.
गावकऱ्यांची
मनं जुळली तर कोणतीही गोष्ट
कठीण नाही,
याचं
प्रत्यंतर सुनील पोटे यांनी
घडवलं.
लोणारवाडी
परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध
झालं खरं,
पण
पुढं काय?
कोणती
पिकं घ्यायची,
शेतात
पिकवायचं काय,
उत्पन्न
वाढवायचं कसं,
याची
चर्चा सुरू झाली आणि त्यातूनच
आकाराला आला पाच गुंठ्याचा
प्रयोग !
लोणारवाडी
परिसरात सगळीकडं एकाच प्रकारची
पिकं दिसत.
तेच
पीक वारंवार घेतल्यानं जमिनीतील
अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी
होऊन तिचा कस कमी होतो.
पिकांचा
फेरपालट हा त्यावरचा उपाय.
नेमकं
हेच या तरूणांनी हेरलं.
वडगाव
आणि भाटवाडी गावातील २८
शेतकऱ्यांना सुरूवातीला याचं
प्रशिक्षण द्यायचं सुनील
पोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी
ठरवलं.
शेतकऱ्यांना
रोजच्या रोज उत्पन्न मिळालं
पाहिजे,
या
उद्देशानं हे प्रशिक्षण होतं.
अगदी
दोन किंवा तीन एकर क्षेत्र
असलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी
वांगे,
मेथी,
ब्रोकोली,
भोपळा,
मिरची
असा भाजीपाला एकेका गुंठ्यात
लावायला सांगितला;
तोही
विशिष्ट दिवसांनी.
त्यामुळं
उत्पादन सुरू झाल्यानंतर रोज
एक भाजी बाजारात जाईल,
याची
काळजी घेतली गेली.
महत्त्वाचं
म्हणजे,
ही
भाजी घेऊन शेतकरी स्वतःच
बाजारात जाऊ लागला.
त्यामुळं
बाजारभाव नेमका काय आहे,
दलाल
कसे फसवतात हे त्यांच्या
लक्षात आलं.
बरं,
पाच
गुंठ्यातच भाजीपाला असल्यानं
वेगळे शेतमजूर ठेवण्याची गरज
नव्हती.
नवरा-बायकोनं
काम केलं तरी पुरेसं होतं.
रोज
पाचशे रूपयांचं उत्पन्न
त्यातून सुरू झालं.
अशा
एकेकट्या शेतकऱ्यांचं पाच
गुंठ्यातलं भाजीपाला उत्पादन
प्रचंड वाढलं.
ताजी
भाजी रोज तयार व्हायला लागली.
सुनील
पोटेंनी मग थेट मुंबईच्या
'स्टार
इंडिया'
या
टाटांच्या मॉलशी संपर्क साधला.
तिथून
अनुकूल प्रतिसाद मिळाला आणि
लोणारवाडीची भाजी रोजच्या
रोज पोचली थेट टाटांच्या
मुंबईतल्या मॉलमध्ये!
पाच
गुंठे शेतीची वैशिष्ट्ये खूप
आहेत.
शेतकऱ्याला
त्यात एकावेळी अनेक प्रकारच्या
भाजीपाल्याची लागवड करता
येते.
एका
पिकासाठी वापरले गेलेले
क्षेत्रही कमी असते.
त्यांचे
अनेक वाण असतात.
त्यामुळं
पिकांवर पडणाऱ्या किडी किंवा
रोगांचं प्रमाण कमी असतं.
परिणामी,
त्याच्या
नियंत्रणासाठी होणारा खर्च
घटतो.
बाहेरचे
मजूर लावावे लागत नाहीत.
दररोज
घरी पैसा येतो.
पाच
गुंठे क्षेत्रातील भाजीपाला
आवश्यकतेनुसार स्थानिक
बाजारपेठेतही विकता येतो.
स्वतःचं
मोटारसायकल किंवा एखाद्या
वाहनानं बाजारात जाऊन मालविक्री
करणं शक्य असतं.
त्यामुळं
वाहतुकीचा खर्च आटोपशीर असतो.
मध्यस्थाकडून
होणारी गळचेपी वाचते.
पाच
गुंठ्यावर वेगवेगळी भाजी
घेतल्यानं पिकाचा फेरपालट
होतो.
जमिनीचं
आरोग्य आणि सुपीकता टिकून
राहते.
कुटुंबाच्या
गरजा भागतात आणि मुलांच्या
शिक्षणाकडं,
कुटुंबाच्या
आरोग्याकडं लक्ष देणं शेतकऱ्याला
शक्य होतं.
लोणारवाडीतल्या
युवामित्रांनी हे सगळं
क्रमाक्रमानं घडवून आणलं.
समाजापुढं
एक आदर्श ठेवला.
पाच
गुंठे शेतीच्या प्रयोगासाठी
मशागतदेखील विशिष्ट पद्धतीनं
केली जाते.
नांगरणी
करण्यापूर्वी एक बिघा क्षेत्रासाठी
चार टन कुजलेलं शेणखत टाकलं
जातं.
त्यातून
किडी किंवा रोग पसरू नयेत
म्हणून शेणखत शेतात टाकण्यापूर्वी
खड्ड्यातून काढून मोकळ्या
जागी उन्हात वाळवलं जातं.
त्यातून
किडे किंवा त्यांची अंडी नष्ट
होतात.
मग
त्याचा वापर केला जातो.
शास्त्रशुध्द
पद्धतीनं शेती केली तर फायदा
होतोच.
गावकऱ्यांनी
त्यांचं पारंपरिक शहाणपण
वापरलं तर फार मोठा फायदा
होतो.
"खेड्यातली
मंदिर वर्षानुवर्षे टिकतात,
कारण
ती शेतकऱ्यांनी बांधलेली
असतात;
पण
गावातल्या शाळेच्या भिंती
किंवा इमारती मात्र कोसळतात
कारण त्या सरकारनं बांधलेल्या
असतात",
असं
एक सोपं सूत्र सुनील पोटे आणि
युवामित्र सांगत असतात.
ते
खरंही आहे !
शेतीला
पाणी आलं,
उत्पादन
वाढलं.
पण
बियाणं आणि खतांसाठी शेतकऱ्यांची
अडवणूक होऊ लागली.
युवामित्रांनी
मग त्यासाठीही पुढाकार घेतला.
जैन
ठिबक,
टाटा
आणि इतर खत कंपनीच्या मालकांशी
संपर्क साधून वाजवी भावात
किटकनाशकं,
खतं,
बियाणं
घेण्यासाठी 'देवनदी
व्हॅली अॅग्रिकल्चर प्रो़ड्युसर्स
लिमिटेड'
ही
संस्थाच स्थापन केली.
या
कंपनीचं खतं-बियाणांचं
मोठं दुकानच थाटलं.
कोणतीही
फसवणूक न होता खात्रीचं बियाणं,
खतं
आणि आवश्यक ती औषधं मिळायला
लागली.
शेतकऱ्यांची
बचत आणि बरकत दोन्ही वाढली.
ही
सोय झाली,
पण
आपल्या परिसरातील मातीचा गुण
कोणता आहे,
तिचा
दर्जा काय आहे,
याचीही
माहिती आवश्यक असल्याचं
शेतकऱ्यांच्या लक्षात आलं.
पिकांच्या
दर्जेदार वाढीसाठी १६
अन्नद्रव्यांची गरज लागते.
त्यात
ऑक्सिजन,
हायड्रोजन,
कर्ब
ही जास्त प्रमाणात लागणारी
अन्नद्रव्ये आहेत.
नत्र,
स्फूरद
आणि पालाशची गरज असते.
वाढत्या
लोकसंख्येची अन्नधान्याची
गरज,
अधिकाधिक
उत्पादन देणाऱ्या वाणांचा
वापर,
ओलिताखाली
येणाऱ्या जमिनींचं वाढतं
क्षेत्र,
बहुविध
पीक पद्धतीचा अवलंब,
परिणामी
जमिनीची कमी होणारी सुपीकता
ही आजची गंभीर समस्या आहे.
अशा
स्थितीत सेंद्रिय,
जैविक
आणि रासायनिक खतांचा समतोल
साधायचा असेल तर माती परीक्षण
गरजेचं असतं.
उत्पादन
वाढावं म्हणून शेतकरी रासायनिक
खतं भरमसाठ वापरतात.
लोणारवाडी
परिसरातही हा प्रकार वाढला.
तो
लक्षात घेऊन युवामित्रांनी
मग स्वतःची माती परीक्षण
प्रयोगशाळाच काढली.
परिसरातल्या
पंचवीस गावाच्या सगळ्या
जमिनींचा पोत,
त्यांच्या
मातीची गुणवत्ता तपासली गेली.
त्यानुसार
कोणते पीक घ्यायचे,
त्यासाठी
खताची मात्रा किती द्यायची
याचं गणित ठरवण्यात आलं.
साहजिकच
रासायनिक खतांचा भडिमार
थांबला.
माती
परीक्षणामुळं पिकाला आवश्यक
ती खतमात्रा देता येऊ लागली.
जमिनीचा
कस कायम राहिला.
जमिनीतील
आवश्यक असणाऱ्या सुक्ष्मजीवांचं
संवर्धन झालं.
पोत,
घनता
आणि पाणी धारण करण्याची क्षमता
कळणं माती परीक्षणामुळं शक्य
झालं.
सुनील
पोटे आणि युवामित्रकडं आज
परिसरातील सगळ्या शेतांतील
माती परीक्षणाचे दाखले आहेत.
लोणारवाडीजवळच
औंढेवाडी नावाचं सुंदर गाव
आहे.
डोंगरानं
त्याला अलगद कुशीत घेतलं आहे.
तिथं
प्रचंड पाऊस होतो.
पण
डोंगरावरून तो वाहून जातो.
औंढेवाडीचे
ग्रामस्थ सुनील पोटेंशी
वारंवार याबद्दल बोलत होते.
काहीतरी
तोडगा काढायला हवा असं साऱ्यांनाच
वाटत होतं.
'युवामित्र'नं
मग डोंगरात एक शोधमोहिम सुरू
केली.
डोंगरातलं
पाणी ठिबकण्याची ठिकाणं शोधून
काढली.
ज्याठिकाणी
पाणी जास्त आणि दीर्घकाळ ठिबकत
राहतं,
ती
जागा शोधली.
तिथं
प्रचंड मोठा हौद बांधला.
त्या
हौदातून गावात जलवाहिनी आणली.
शेतकऱ्यांना
हाताशी धरून त्यांच्या
श्रमदानातूनच हे सगळं त्यांनी
घडवून आणलं.
त्यासाठी
खर्च आला दीड लाख रूपये.
तोही
गावकऱ्यांनी,
शेतकऱ्यांनी
वर्गणीतून जमा केला.
औंढेवाडी
गावाची पाणी समस्या अशी
कायमस्वरूपी सुटली.
सरकारी
खर्चानं ती करायची ठरवली असती
तर किती कागदी घोडे नाचवावे
लागले असते,
किती
जणांना चंदीचारा घालावा लागला
असता,
हे
सांगणं कठीण आहे.
आपल्या
गावाच्या परिसरात कोणती झाडं
आहेत,
किती
जनावरं आहेत,
याची
माहिती प्रत्येक गावकऱ्याला
असणं आवश्यक असतं.
पण
कित्येक खेड्यांमध्ये,
त्यांच्या
जवळपासच्या छोट्यामोठ्या
जंगलात,
वनात
मौलिक वनस्पती असूनही त्याची
खबरबात नसते.
'युवामित्र'नं
खोपडी गावात एक वेगळा प्रयोग
केला.
तिथं
एक 'इको
क्लब'
स्थापन
केला आणि त्याच्या माध्यमातून
एक जैवविविधता नोंदवहीच तयार
केली.
या
'इकोक्लब'मध्ये
२८ शाळकरी मुलं-मुली
आहेत.
त्यांची
शिवारफेरी काढली जाते.
अगोदर
गावच्या नैसर्गिक संसाधनाचा
नकाशा तयार करण्यात आला.
त्यात
गावातील पशू-पक्षी,
वनस्पती,
पाण्याचे
स्त्रोत रेखाटण्यात आले.
त्या
नकाशाच्या सहाय्याने शिवारफेरीत
आढळलेल्या गोष्टींची नोंद
केली जाऊ लागली.
शिवार
फेरी झाली की गावातल्या
वाचनालयात बैठक घेतली जाते.
तीत
या नोंदींचं विश्लेषण केलं
जातं.
खोपडीचा
इतिहासही शोधण्याचं काम याच
मोहिमेतून झालं.
ऐतिहासिक
स्वरूपाची महत्त्वाची माहिती
त्यातून गोळा झाली.
वेरूळजवळ
शहाजी महाराजांचं युद्ध झालं
होतं.
त्यांच्याकडच्या
जनावरांना मुबलक चारा उपलब्ध
कुठं होईल,
याची
महाराजांना चिंता होती.
तेव्हा
त्यांनी खोपडी परिसरातील
चाऱ्याची आणि पाण्याची उपलब्धता
पाहून त्यांची जनावरे देवनदीकाठी
वस्तीसाठी आणल्याचं लक्षात
आलं.
शिवार
फेरीतून गावच्या परंपरेची
माहिती जमा झाली.
गावात
बारा बलुतेदारांची पद्धत
होती.
कुंभार
गावकऱ्यांना मडकी,
तवल्या,
माठ,
रांजण
बनवून देत.
पोळ्याला
मातीचे बैल,
दसऱ्याला
बुरकुले,
दिवाळीला
पणत्या बनवून दिल्या जाई.
स्वयंपाकासाठी
चुलीही बनवून देत.
गावातील
सुतार लाकडी नांगर,
वखर,
जू,
हळस,
शिवळा,
जाडी,
पाभर
अशी शेतीला आवश्यक असलेली
अवजारे शेतकऱ्यांना बनवून
देत.
गावात
लागवडीखाली किती जमिनी आहेत,
पडिक
किती आहेत,
सार्वजनिक
वापरासाठी किती जमिनी आहेत,
भाडेपट्ट्यानं
दिलेली जमीन किती आहे याच्याही
नोंदी केल्या आहेत.
गावच्या
लोकसंख्येबरोबरच स्त्री-पुरूष
संख्या,
लोकसंख्येची
जातनिहाय वर्गवारी,
दारिद्र्यरेषेखालील
कुटुंबे,
भूमिहिन
कुटुंबे यांच्याही नोंदी
करण्यात आल्या.
गावातील
धाब्याच्या,
उतरत्या
छपराच्या आणि पक्क्या घरांची
मोजणी केली.
पिण्याच्या
पाण्याची व्यवस्था आणि
सांडपाण्याचं विसर्जन कसं
केलं जातं याचीही माहिती
घेण्यात आली.
आवश्यकतेनुसार
त्याचं नियोजन केलं गेलं.
आपलं
जगणं स्वयंपूर्ण असलं पाहिजे,
असं
आपण म्हणतो.
महात्मा
गांधीजींनी ते सप्रयोग सिद्धही
करून दाखवलं आहे.
त्यासाठी
आपल्या परिसराची,
आपल्या
भूभागाची माहिती असणं गरजेचं
आहे.
युवामित्रनं
खोपडी गावातील लोकांच्या
उपजीविकेच्या व्यवसायाची
माहिती नोंदवहीत ठेवली आहे.
त्याचा
नमूना पाहिला तर थक्क व्हायला
होतं.
गावात
१८५ कुटुंबे पूर्णवेळ शेती
करतात.
त्यासाठी
बैल,
ट्रॅक्टर,
आणि
अन्य आधुनिक तंत्रज्ञान वापरलं
जातं.
वर्षभरात
घेतल्या जाणाऱ्या फळभाज्या,
नगदी
पिकं,
कडधान्यं,
तेलबिया,
धान्य,
चारा
पिकांची नोंद करण्यात आली
आहे.
शेतीसाठी
पाझर तलाव,
वसंत
बंधारा,
शेततळी,
ब्रिटिशकालिन
पाट आणि विहिरींचे पाणी दिले
जाते.
एवढ्यापुरत्या
या नोंदी मर्यादित नाहीत.
पारंपरिक
ज्ञान आणि कौशल्य असणाऱ्या
गावातील व्यक्तींच्या नोंदी
विशेषत्वानं करण्यात आल्या.
गोविंद
रूपवते यांच्याकडं विविध
कौशल्यं आहेत.
डोळ्यातील
कचरा ते जिभेच्या शेंड्यानं
काढतात.
साप
चावल्यास औषधी पाल्यानं विष
उतरवतात,
पाळीव
जनावरांवरही उपचार करतात.
जनावर
फुगले तर घुल्याच्या बियांचा
सुयोग्य वापर करतात.
गाभण
गाय अडली असेल तर अंबाडीच्या
दशीचा वापर करून तिची सुटका
करतात.
त्याला
सावड म्हणतात.
गणपत
कुरूळे यांना शेतीच्या वाणाची
चांगली माहिती आहे,
सोपान
बर्डे बैल बडवतात.
हिरामण
बर्डे यांना देव नदीतील जलचराची
इत्थंभूत माहिती आहे.
जैववैविधतेची
माहिती गावाचं महत्त्व वाढवते.
गावकऱ्यांमध्ये
एकोपा निर्माण करते.
खोपडी
परिसरातील गारमळा भागात
निरगुडी,
महारूख,
शतावरी,
डिडवणी,
घायपात,
कांडीसांबर,
रानतुळस,
धोत्रा,
पारसा
एरंड,
सीताफळ,
रूई,
टनटनी
या वनस्पती आढळतात.
थोरात
बंधाऱ्यावर मोरांचा कळप कायम
वस्तीला असतो,
कारण
तिथं बारमही पिण्याचं पाणी
उपलब्ध असतं.
बंधाऱ्यामुळं
बागायत क्षेत्र असल्यानं
मोरांना अळ्या,
किटक
खायला मिळतात.
गावातल्या
मधल्या मळ्यात पपई,
सीताफळ,
रामफळ,
आंबा,
चिंच,
कडुनिंब,
जांभूळ,
वड,
उंबर,
पिंपळ,
डाळिंब,
पेरू,
लिंबू,
बोर
अशी झाडं आहेत.
जलपक्षी,
जंगली
वनस्पती,
फुलझाडं,
वेली,
किटकांची
विविधता,
वेगवेगळ्या
प्रकारचं गवत,
पाळीव
प्राणी,
सरपटणारे
प्राणी,
जंगली
प्राणी आणि जलचर यांची नोंद
परिसराची समृद्धता सांगतात.
या
जैवविविधता टिपण्याच्या
उपक्रमामुळं गावातल्या
मुला-मुलींचं
सामान्यज्ञान,
नागरिकशास्त्र,
इतिहास
आणि भूगोल प्रात्यक्षिकासह
तयार झाला आहे.
सुनील
पोटे यांनी त्यांच्या मित्रांनी
'युवामित्र'च्या
माध्यमातून लोणारवाडी आणि
पंचक्रोशीत अनेक उपक्रम
राबवले.
त्यात
शिवारफेरीबरोबरच निसर्गमित्र,
आरोग्यमित्र,
कृषकमित्र,
प्रवास
सहशिक्षणाचा,
दुध
डेअरीचा समावेश आहे.
गावात
'लिब्रेट
स्कूल'ची
संकल्पना राबवली आहे.
अनुभवातून
शिकणं,
कृतीतून
शिकणं अशा पद्धती त्यांनी
प्रचलित केल्या आहेत.
वाचन,
लेखन,
गणितं
करणं,
प्रश्न
विचारणं,
उत्तराचं
विश्लेषण करणं,
स्वतःभोवतीचं
वास्तव जग समजून घेणं,
व्यक्तिगत
आणि सामुहिक कौशल्यांचा उपयोग
करणं ही 'लिब्रेट
स्कूल'ची
संकल्पना आहे.
जीवनकौशल्य
विकसित करणारं शिक्षण प्रत्येक
बालकाला मिळालं तर सृजनशील,
सकारात्मक
आणि आत्मविश्वास असलेला नागरिक
निर्माण होईल,
असं
'युवामित्र'ला
वाटतं.
'युवामित्र'मुळं
अनेकांना जीवनाची वाट सापडली.
गावातला
अनिल शिंदे हा तरूण नाशिकच्या
औद्योगिक वसाहतीत कामाला
होता.
देवनदी
व्हॅली अॅग्रिकल्चर प्रोड्युसर्स
कंपनी स्थापन झाल्यानंतर
तिचं व्यवस्थापन तो करू लागला.
शिवाय
सहा एकर शेती आहे,
तिच्यातून
छान उत्पादन सुरू झालं.
त्यामुळं
आत्मविश्वास वाढला.
तीच
गोष्ट अण्णा नारायण कोटकर
यांची.
ते
म्हणतात,
सहा
एकर शेती असूनही अडचण होती
एकेकाळी.
आता
पाच गुंठ्याच्या प्रयोगानं
भाजीपाल्याची लाईन सापडली
आहे.
आता
मी पंजाबमध्ये कांदा पाठवतो.
'युवामित्र'चे
सोमदत्त लाड म्हणतात :
शेतकऱ्यांना
शिक्षणाबरोबरच प्रशिक्षणाची
गरज आहे.
शेती
फायद्याची आहे,
हे
त्यातून सिद्ध होईल.
लोणारवाडी
आणि परिसरातील साठ तरूण
वेगवेगळ्या इंडस्ट्रियल
इस्टेटींमध्ये रोजंदारीनं
काम करीत जगत होते,
पण
आता ते सारे गावाकडं परतले
आहेत.
आपापल्या
शेतात सोनं पिकवून हिरवं
स्वप्न साकारत आहेत.
कोणत्याही
तीर्थक्षेत्रापेक्षा हे
पर्यटनस्थळ आगळंवेगळं ठरेल,
नाही
का?
या
प्रकल्पाला भेट देण्यासाठी
संपर्क :
सुनील
पोटे.
मोबाईल
– ९४२२९४२७९९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा