उदक चालवावे युक्ती !
----
पर्यावरण आणि निसर्गाच्या रक्षणाबाबत कित्येक शतकांपूर्वी विविध संतांनी जनजागर केला आहे. त्यांनी आपल्या अभंगांमधून पाणी, ऊर्जा, वृक्ष, निसर्ग आणि एकूणच सृष्टीच्या संरक्षणाबाबत नेमके विचार मांडले आहेत. मात्र, तुकोबांची गाथा किंवा ज्ञानेश्वरीच्या पारायणापलीकडे आपण जात नाही. अभंगांचं नुसतं पठण उपयोगाचं नाही, ते आचरणात आणले पाहिजेत. लांबलेला पाऊसकाळ आणि दरवर्षीचा दुष्काळ मानवनिर्मित आहेत. कारण संतांनी त्याकाळात दिलेल्या पाण्याचा वापर युक्तीने करण्याच्या म्हणजेच काळजीकाट्यानं करण्याच्या इशाऱ्याकडं आपण सोईस्कर दुर्लक्ष केलं आहे.
बळ बुद्धी वेचूनिया शक्ती, उदक चालवावे युक्ती ।
नाही चळण तया अंगी, धावे लवणामागे वेगी ।।
पृथ्वीवर पडणारा पाऊस साठवला पाहिजे, त्याचं पाणी युक्तीनं चालवलं पाहिजे, असं तुकोबाराय सांगतात. उताराकडं वाहण्याची पाण्याची सवय असते. ते ध्यानात घेऊन पाण्याला हवी तशी दिशा दिली पाहिजे. मात्र, त्याआधी आकाशातून पडणारा थेंब साठवण्यासाठी कंबर कसली पाहिजे. थेंब थेंब पाणी रानात मुरत गेलं तरच जागोजागी उदंड पाणी साठेल. खेड्याप्रमाणेच शहरातही अनेक ठिकाणी बोअरवेल आहेत. त्यातील पाणी कायम टिकवायचं असेल तर त्यांचं पुनर्भरण केलं पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा